दारूच्या नशेत भाच्याने केला मामाचा खून
सत्यविचार न्यूज :
दारूच्या नशेत भाच्याने (Chakan)मामाचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी रासे गावात उघडकीस आली.
संदीप खांडे (वय 40, रा. ठाकर वस्ती, रासे) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. याप्रकरणी भाचा सुरेश मेंघळ (वय 36, रा. ठाकर वस्ती, रासे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व आरोपी दोघेही लांबचे मामा भाचे आहेत. मागील काही दिवसात त्यांच्यात दारू पिल्यानंतर वाद झाला होता. बुधवारी रात्री पुन्हा दोघांचे दारू पिल्यानंतर भांडण झाले. भांडणात सुरेश याने मामा संदीप याचा खून केला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
अनंत चतुर्दशीच्या (Chakan) दिवशी हे मामा भाचे वाद्य वाजविण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यांना प्रत्येकी 440 रुपये मानधन मिळाले. त्यामुळे बुधवारी ते पुन्हा दारू प्यायला बसले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. यामुळे संतापलेल्या भाचा सुरेश मेंघळ यांने सरपणाचा ओंडका संदीप खांडे याच्या डोक्यात मारला. यामुळे संदीप हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी सुरेश याने गळा दाबून संदीप याचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चाकण पोलिसांनी तपास करत भाचा सुरेश मेंघळ याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.