कोरेगाव खुर्द चा अभिमन्यू बुटे सलग दुसऱ्यांदा तालुक्यात प्रथम
सत्यविचार न्यूज :
52 व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव खुर्द च्या अभिमन्यू शरद बुटे याने इयत्ता सहावी ते आठवी गटात सलग दुसऱ्या वर्षी खेड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दिनांक 17 व 18 डिसेंबर रोजी इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल,चाकण येथे पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनात अभिमन्यू याने सादर केलेल्या गर्ल्स सेफ्टी शूज या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मागील वर्षी अभिमन्यू च्या मॅजिक हेल्मेट या प्रकल्पाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला होता.
आता जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी तो पात्र ठरला आहे.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.त्याला प्रकल्पासाठी मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक स्वाती खैरे,शिक्षकवृंद उज्वला बगाटे ,नीता माळशिरसकर,मिरा पवळे,दिलीप वाळके,पल्लवी अभ्यंकर तसेच वडील शरद बुटे,आई चैताली बुटे यांनी मार्गदर्शन केले.
त्याच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मा.अमोल जंगले साहेब,विस्तार अधिकारी मा.राजेश टिळेकर साहेब, केंद्रप्रमुख मा.सौ छाया फल्ले मॅडम,सरपंच सौ.सीमाताई राजूशेठ झांबरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अशोक कडुसकर,उपाध्यक्ष मीनाताई गोगावले, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सोसायटी सदस्य , पोलिस पाटील, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.