श्री जोपादेवी देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा
राजगुरुनगर : हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथील जोपादेवी देवस्थानला अखेर ‘क’ वर्ग दर्जा मिळाला आहे. खालुम्बे गावचे सरपंच सोनल बोत्रे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले आहे.
याबाबत शरद बुट्टे पाटील म्हणाले, जोपादेवी देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्य शासन, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
जोपादेवी देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, निधीअभावी या देवस्थानचा विकास रखडला होता. त्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. त्यामुळे खालुम्ब्रेचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्यारीतीने सुविधा देता येणार आहेत, असे सांगण्यात आले.
खूप छान निर्णय आणि धन्यवाद शरद भाऊ बुट्टे पाटील आणि ग्राम पंचायत व ग्रामस्थ खालूंबरे सर्व आणि शासन चा धन्यवाद 💐🙏💐