पुणे-ताम्हणी घाटात प्रवासी बसचा अपघात : ४ जण ठार तर २० ते २५ जण जखमी
सत्यविचार न्यूज :
ताम्हणी घाटात प्रवासी बसचा अपघात झालेला असून बस मध्ये जाधव कुटुंबीय लग्नासाठी पुण्याहून बिरवाडीला जात असताना अपघात झाल्याचे समजते. या अपघातात ४ जण ठार तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवडवरून महाडकडे लग्नासाठी निघालेल्या खासगी बस क्रमांक एम एच १४ जी यु ३४ ०५ या बसचा ताम्हिणी घाटात एका तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला.
बसखाली बसमधीलच चार प्रवासी चिरडले असल्याचे समोर येत आहे.एकूण ४० प्रवासी या बसमध्ये असून त्यात ४ जण मृत झाल्याची माहिती हाती आली आहे तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले असल्याचे समजते आहे . जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी माणगाव पोलीस तसेच मदत कार्य वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत.