सत्यविचार न्यूज :
लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर व लायन एडवोकेट दीपक अशोकराव गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सलग १७-१८ तास ऑन ड्युटी राहून गणेशोत्सव मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, होमगार्ड आणि स्वयंसेवक बांधवांना तंदुरुस्त बंदोबस्त मोहिमे अंतर्गत अल्पोपहार वाटप करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, एस. टी. महामंडळाचे स्थानकप्रमुख तुकाराम पवळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमात आहार पॅकेटचे सौजन्य लायन एडवोकेट दीपक अशोकराव गुरव यांच्यावतीने करण्यात आले. या उपक्रमास लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष नितीन दोंदेकर सचिव मनीष बोरा, खजिनदार विजय घोरपडे तसेच अंबर वाळुंज, मिलिंद आहेर, कुणाल रावळ, डॉ. सागर गुगलिया, ऍड. दीपक गुरव, चेतन वाडेकर, सागर लाखे, रमेश बोऱ्हा डे, विनोद हाडवळे, स्नेहल दोंदेकर, वैशाली गुगलीया, हिना मोमीन, स्वीटी रावळ, दिपाली हाडवळे, नम्रता थिगळे, अर्चना बोरा, नीता गुरव हे लायन सभासद उपस्थित होते. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक हिरामण सातकर प्रदीप कासवा व स्वानंद खेडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.