संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ आळंदी मध्ये धारकऱ्यांचा मोर्चा…
भिडेंबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ आळंदी मध्ये दुग्धभिषेक करत आंदोलन केले. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वत्र टीका होत असताना आळंदीमध्ये त्यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करण्यात आला.
संभाजी भिडे यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने तर त्यांना अटक करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आळंदी मध्ये संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ धारकऱ्यांनी मोर्चा आंदोलन केले.
येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी माध्यमांनी भिडे यांचा एकेरी उल्लेख टाळावा अशी आगपाखड देखील भिडे गुरुजींच्या समर्थकांनी केली. आंदोलनात मोठ्यासंख्येने धारकरी, वारकरी व महाविद्यालयीन युवक सहभागी झाले होते.
भिडेंबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ आळदीत धारकरी आणि वारकऱ्यांकडून दुग्धाभिषेक….
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी महापुरुष बद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. आळंदीत संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी तसेच वारकरी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करुन समर्थन देण्यात आले.
गेले काही दिवस संभाजी भिडे गुरुजींच्या भाषणातील अर्धवट भाग दाखवून प्रसार माध्यमांतून अत्यंत खालच्या स्तरावर टीका सुरू आहे.