चाकण येथे सोमवारी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल,.
चाकण : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठापणेच्या तृतीय वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोमवारी ( दि.२३ ) विविध अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष किसनशेठ गोरे यांनी दिली.
चाकण पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या श्री भैरवनाथ मंदिरात सकाळी नऊ ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवाचा अभिषेक, आरती महाआरती, महाप्रसादाचे वाटप व समाज प्रबोधनकार ह.भ.प. श्रीकांत महाराज पातकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. चाकण पंचक्रोशीतील भाविकांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवण सुखाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष किसनशेठ गोरे यांनी केले आहे.