काळुस गावातील शालेय समितीच्या उपाध्यक्षपदी रामदास गायकवाड यांची निवड
कुणाल शिंदे (प्रतिनिधी)
पुणे
खेड तालुक्यातील बारा वाड्या असलेल्या काळुस गावातील पुणे जिल्हा परिषद शाळेच्या उपाध्यक्षपदी रामदास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पहिल्या उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने नवीन पदाची शालेय समितीवर निवड करण्यात आली आहे.
रामदास गायकवाड हे नामांकित कंपनीचे एच आर असून ते कंपनीतील मॅनेजमेंट सांभाळतात. त्यामुळे शालेय व्यवस्थापन मध्ये त्यांच्या मॅनेजमेंटचा अनुभव त्यांना मिळणार आहे व शाळेतील काही प्रमुख बाबी असेल याच्यावर देखील उपाध्यक्ष म्हणून चांगल्या गोष्टी लक्षात आणून त्या सुरळीत करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत असे त्यांनी बोलताना म्हटले.यावेळी त्यांचे गावातील नागरिकांनी त्यांचा सन्मान करून अभिनंदन केले .