व्यक्तिमत्व फुलवताना पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशनाची पर्वणी
सत्यविचार न्यूज :
महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई राज्य पुरस्कार प्राप्त आणि पुण्यातील नामवंत आपटे प्रशालेतील शिक्षिका हर्षा पिसाळ यांनी लिहिलेल्या व्यक्तिमत्व फुलवताना या पुस्तकाचे प्रकाशन नीलकंठ पब्लिकेशन तर्फे पुणे पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध लेखक डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी लेखिका हर्षा पिसाळ, नीलकंठ प्रकाशनचे प्रकाशक मुकुल मारणे आदी मान्यवर उपस्थित होते. हर्षा पिसाळ म्हणाल्या, हे पुस्तक माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना समर्पित आहे राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणासाठी विचार महत्त्वाचा आहे. जो विचार कृतीमध्ये परिवर्तित होणार आहे. सक्षम व्यक्तिमत्व असलेला विद्यार्थी उद्याची राष्ट्र घडवणार आहे. आणि म्हणून त्याच्या व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. यात उदाहरणार्थ स्वयंशिस्त, शिक्षणातून सहजीवन, विद्यार्थ्यांचा चेहरा कसा ओळखावा, शिक्षकाचे देहबोली कशी असावी, परीक्षेचा मंत्र, परीक्षा फक्त पास होण्यासाठी नको, मूल्यशिक्षण विकसित करण्यासाठी इत्यादी विषयांवर आधारित असे हे व्यक्तिमत्व फुलताना हे पहिले पुस्तक आहे. जे शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई राज्य पुरस्कार प्राप्त पुण्यातील आपटे प्रशालेतील शिक्षिका हर्षा बाळकृष्ण पिसाळ यांनी परिश्रम पूर्वक मुलांसाठी लिहिले आहे.
हे पुस्तक शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना फारच उपयुक्त आहे. दैनंदिन समुपदेशन, विविध शालेय अनुभव आणि शैक्षणिक उपक्रमांवर आधारित असे हे संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे. नॅशनल बुक ट्रस्ट ने हे पुस्तक प्रकाशनासाठी निवडले आहे. ही खरच खूप मोठी गोष्ट आहे. निवड समितीने या पुस्तकाची निवड केल्याचे लेखिका हर्षा पिसाळ यांनी सांगितले.