चाकण पोलीस ठाण्यात पोलिसांना बांधल्या राख्या,
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
चाकण लायन्स क्लबच्या वतीने चाकण पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनानिमित्त ७२ पोलिस बांधवांना लायन्स भगिनींनी राख्या बांधल्या.
याप्रसंगी कल्पना मांजरे, वंदना मिर्गे, उज्ज्वला जाधव, सुलोचना शिर्के, शनाया शिर्के, शालन माळी, ज्योती कड, अश्विनी मुटके , संगीता येवले, स्मिता लेंडघर, अपर्णा कानडे तसेेच प्रकाश मुटके, डॉ. रमेश जाधव, दिलीप परदेशी, प्रकाश मांजरे, शंकर डोंगरे, उल्हास शिर्के, विलास मांजरे, शंकर गवते, एकनाथ येवले, अविनाश सोनवणे, डॉ. लोणारे, मयूर माळी, चाकण लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश कानडे आदि उपस्थित होते. अपर्णा कानडे यांनी आभार मानले.