चाकणला घाऊक बाजारात कांद्याच्या दरात उसळी
सत्यविचार न्यूज :
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (Chakan) (ता. खेड) येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चाकण मार्केट मध्ये कांद्याची सुमारे 2 हजार पिशवी म्हणजे 1 हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला 50 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाल्याचे अडते, व्यापारी व बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यात आल्याने कांद्याची निर्यात वाढून भावात आणखी सुधारणा पुढील काळात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा आता जवळपास संपलेला असताना कांद्याच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांच्या किती फायद्याची असा प्रश्न खुद्द शेतकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान पितृपक्ष सुरु झाल्याने पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या कडाडल्या असून या भाज्यांची एक (Chakan) गड्डी घाऊक बाजारात 50 रुपयांना विक्री होत असल्याचे सांगितले आहेत.
नवीन बटाट्याची आवक सुरु :
चाकण मार्केट मध्ये नवीन तळेगाव बटाट्याची आवक सुरु झाली आहे.
या बटाट्याला बाजारात मोठी मागणी आहे. चाकण मध्ये तळेगाव बटाट्याची 1 हजार क्विंटल आवक होऊन या बटाट्याला प्रतीक्विंटलला 2500 ते 3 हजार रुपये एवढा दर मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनकडून सांगण्यात आले