चाकणला ए. के. उड्डाण स्कूलमध्ये प्रदूषणमुक्तीचा संदेश,
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
लायन्स क्लब चाकण यांच्या वतीने येथील ए. के. उड्डाण स्कूलमध्ये प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला. चाकण लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश कानडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. चाकण लायन्स क्लबतर्फे १५० मुलांना खाऊ वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेच्या वतीने यावेळी प्लॅस्टिक बलून ऐवजी रंगीत कागदाची सजावट करून प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेेळी दिलीप परदेशी, अविनाश सोनवणे, प्रकाश मांजरे, विलास मांजरे, अपर्णा कानडे, शिक्षक वृंद व परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.