सत्यविचार न्यूज :
चाकण येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा,.
चाकण : प्रतिनिधी
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी रे माया, या काव्यपंक्ती सत्यात उतरवत बहिण भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन सण चाकण व पंचक्रोशीत भरगच्च उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
चाकण येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शहरात राख्यांची दुकाने लवकरच सजली होती. चाकण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पुजा कड – चांदेरे व भापसे पार्टीचे अध्यक्ष दिपक ताटे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन या सणानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण होण्याकरिता या भागातील महिलांनी यावेळी झाडाला राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला.
तर चाकण शहरातून सीमेवर लढणाऱ्या जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. अनाथ मुलांनाही राख्या बांधण्यात आल्या. महिला कार्यकर्त्या जयश्री ताटे यांनी सर्वांचे स्वागत केले.
राष्ट्रवादीचे चाकण शहराध्यक्ष राम गोरे, माजी नगरसेवक राहुल कांडगे, उद्योजक बप्पासाहेब जोगदंड, नगरसेविका मेनका बनकर, उद्योजक सागर बनकर आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले. दिपक ताटे यांनी सांगितले की,” रक्षाबंधन हा सण बहिण भावाचे नाते घट्ट करणारा पवित्र आणि अत्यंत महत्वाचा सण आहे. या सणामुळे कौटुंबिक जिव्हाळ्याची नाती आणखी घट्ट होतात.”