बहुळ गावामध्ये हर घर तिरंगा रॅली उत्साहात साजरी
राजगुरूनगर :
येत्या १५ ऑगस्ट रोजी भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन असून देशभरात स्वातंत्र्य महोत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज (National Flag) फडकवण्याचे आवाहन आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे.
या अभियानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायत बहुळ, सर्व ग्रामस्थ बहुळ तसेच सुभाष माध्यमिक विद्यालय बहुळ व जि प शाळा, युवा बहुळकर सोशल फाउंडेशन यांच्या सहभागाने बहुळ गावामध्ये तिरंगा रॅलीचे दिमाखदार व उत्साहाने आयोजन दि. १० ऑगस्ट रोजी करण्यात आले.
याप्रसंगी राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून गौरविलेल्या बहुळ ग्रामपंचायतच्या आदर्श लोकनियुक्त सरपंच सौ. अश्विनीताई संदिपभाऊ साबळे, उपसरपंच सौ. संगीताताई प्रतापदादा वाडेकर, सोसायटी डायरेक्टर संदिपभाऊ साबळे, सुभाष विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिलजी टाव्हरे व त्यांचा सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी शिक्षिका निलिमा डोमाळे, दिपाली पानसरे, पुनम गवारे, आशा वर्कर संगीता गवारे व सुवर्णा आरेकर, अश्विनी वाडेकर, योगिनी पोळ, राजेंद्र बगाटे, हनुमंत शेंडे, ग्रा.पं. कर्मचारी सुवर्णा खलाटे, दत्तात्रय साबळे, सुंदर गवारे तसेच देशाचे भवितव्य असणारे सर्व विद्यार्थी आणि बहुसंख्येने ग्रामस्थ या रॅलीमध्ये सहभागी होते.
आदर्श सरपंच अश्विनीताई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व ग्रामस्थांना आपल्या घरावरती राष्ट्रध्वज गर्वाने फडकविण्याचे आवाहन केले. भारताच्या राष्ट्रध्वजाला ‘तिरंगा’ असे म्हणतात. या तिरंगाची आन-बान-शान राखण्यासाठी सर्व भारतीय आपापल्या क्षेत्रामध्ये प्राणपणाने लढत असतात. एक काळ असा होता की प्रत्येक घरात ध्वजारोहण करता येणे शक्य नव्हते. बऱ्याच बदलांनंतर सामान्य जनतेचे घर, ऑफीस, कार्यालये आणि शाळांमध्ये ध्वजारोहण करणे शक्य झाले. त्यामुळे सर्वांनी या तीन रंगाच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन देशाप्रती राष्ट्रभक्ती जागृत करून तिरंगाचा सन्मान ठेवून ध्वज फडकावा आणि या स्वातंत्र्य महोत्सवामध्ये सहभागी व्हावे जेणेकरून आपण नवीन पिढीला देखील राष्ट्रभक्तीची प्रेरणा देऊ शकू.