सैनिक हो तुमच्यासाठी
राजगुरुनगर :
खेड तालुक्यातील तहसीलदार कार्यालया मध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील अनेक आजी माजी सैनिक उपस्थित होते. सैनिकांच्या महसूल संदर्भातील विविध अडचणी समस्यांच्या विषयी तहसीलदार मॅडम ज्योती देवरे यांनी माहिती घेतली आणि त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
भूमी अभिलेख विभागात सर्वात जास्त समस्यांचा सामना करावा लागतो असे मत माजी सैनिक श्री शांताराम होले यांनी व्यक्त केले. जे सैनिक सेवेत आहेत जे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत आणि जम्मू काश्मीर अरुणाचल प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये आपली सेवा करत आहेत, अशा सैनिकांनी योद्धा माजी सैनिक संघटनेकडे विविध समस्यांच्या बाबतीत अर्ज पाठवले होते. सर्व तक्रार अर्ज योद्धा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री साहेबराव जाधव यांनी तहसीलदार कार्यालयामध्ये सविस्तर माहिती देऊन जमा केले.
सैनिकांसाठी हा एकच दिवस नसून 365 दिवस आम्ही सैनिक हो तुमच्यासाठी हा दिवस साजरा करण्यास तयार आहोत असे उद्गार तहसीलदार ज्योती देवरे मॅडम यांनी काढले. आणि त्यांची सैनिकांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त केली.