डेहणे महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर भागवत यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन या आद्य क्रांतिकारकाला आपल्या मनोगतात अभिवादन केले तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचर्य प्रा. सिलदार पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदिवासी संस्कृतीचा इतिहास उलगडून दाखवला.
विद्यार्थ्यांनी थोर क्रांतिकारक यांचे विचार आत्मसात करावे आपल्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी थोर विचारवंताची आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. क्रांतीची ज्योत आपल्यामध्ये यावी असे विद्यार्थ्यांना संबोधित केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रदीप कडू यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृतीचा आणि आदिवासी जीवनाचा उलगडा करत त्यांनी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे विचार आज देशालाच नव्हे तर जगामध्ये त्यांचे विचार महान आहेत आदिवासी संस्कृतीला नवीन दिशा देण्याचे काम शहीद बिरसा मुंडा यांच्या कार्यातून दिसते असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या काव्यातून शहीद बिरसा मुंडा यांच्या कार्याचा विचार आपल्या शब्दातून मांडला. या कार्यक्रमांमध्ये प्रा. विशाल आढारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक राजकीय जीवनाचा इतिहास उलगडून दाखवत आदिम संस्कृतीचा विकास फार मोठ्या प्रमाणावर शिक्षणामुळे झाला. राजकीय स्वातंत्र्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असे विद्यार्थ्यांना संबोधित केले. तसेच प्रा. दिलीप कदम यांनी आपल्या मनोगतातून थोर आद्य क्रांतिकारक यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भास्कर जगदाळे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप आढारी तर आभार प्रा. कविता तातळे कविता यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.