भापसे पार्टीचा बाबाजी काळे यांना जाहीर पाठिंबा,.
चाकण : प्रतिनिधी
खेड – आळंदी विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांना भापसे पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. भापसे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक ताटे यांनी याबाबतचे एक लेखी पत्र आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत बाबाजी काळे यांना दिले आहे.
खेड – आळंदी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे हे विधानसभेचे निवडणूक लढवत आहेत. बाबाजी काळे हे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली खेडच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बाबाजी काळे हे वारकरी संप्रदायाचे नम्र आणि संयमी व्यक्तिमत्व असल्याने भापसे पार्टीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याप्रसंगी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांतीताई सोमवंशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुलभाऊ देशमुख, शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, बाजार समितीचे संचालक माणिकशेठ गोरे, चाकण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे, शहर उपप्रमुख प्रेम जगताप, भापसे पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री ताटे, युवा नेते धीरज ताटे, जालिंदर उपाडे, शेखर पिंगळे, पांडुरंग गोरे, स्वामी कानपिळे, उद्योजक दत्तात्रय जाधव, लक्ष्मण जाधव आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, शिवसेनेचे व भापसे पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबाजी काळे यांना सर्वसामान्य जनतेची कामे करण्याची आवड आहे. त्यामुळे त्यांना सुज्ञ मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काळे यांच्या माध्यमातून महाआघाडीचे हात बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे. भापसे पार्टीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बाबाजी काळे यांच्यासह महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा झेंडा फडकवून सर्व उमेदवार आपल्या विजयाचा गुलाल उधळणार आहेत, यात तीळमात्र शंका नाही.” – दीपकभाऊ ताटे, पक्षप्रमुख, भापसे पार्टी