खेडच्या पुर्व भागाला लवकरच कळमोडीचे पाणी मिळणारं;
अडचणीच्या काळात जनतेच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिलो.आमदार दिलीप मोहिते पाटील.
सत्यविचार न्यूज :
संतोषनगर (ता: खेड) येथे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोहिते पाटील बोलतांना म्हणाले की उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी जैदवाडी, जरेवाडी, गुळाणी, वाफगाव, वरुडे, कनेरसर, गाडकवाडी,पुर, जऊळके या गावांसाठी नविन सुधारित योजनेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार असून कान्हेवाडी व तीन्हेवाडी या गावांना देखील पाणी देण्यात येणारं आहे. सदर प्रकल्पामध्ये खेड तालुक्यातील आदिवासी भागातील शेंदुर्ली(खामकरवाडी), एकलहरे(आंबेकरवाडी,बांगरवाडी)धामणगाव खु||,कुडे बु||(बांगरवाडी,पाळेवस्ती,कळमोडी पठार,या आदिवासी वस्त्यांचा तसेच चिखलगावचा उपसा जलसिंचन योजना प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.अडचणीच्या काळात तालुक्यातील जनतेच्या पाठीमाघे भक्कम पणाने उभा राहिलो. जनतेची कामे केली. प्रश्न सोडवले असे प्रतिपादन आमदार मोहिते पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले बोलतांना म्हणाले की संतोषनगर गावच्या निर्मितीसाठी आण्णांचे मोलाचे सहकार्य लाभले. आम्ही गावातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन सर्वाधिक मताधिक्या देऊ अशी ग्वाही भोसले यांनी दिली.
यावेळी जि. प. माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक राम गोरे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, शांताराम भोसले, दिलीप नाईकनवरे, शांताराम सोनवणे,माजी सभापती कैलास लिंभोरे, विलास कातोरे,शांताराम चव्हाण, संध्या जाधव,वैशाली जाधव,गणेश सांडभोर, राजेंद्र वाळुंज, बाजार समितीचे संचालक हनुमंत कड, विनोद टोपे, जयसिंग भोगाडे, माणिक कदम, दिनेश मोहिते पाटील, दशरथ गाडे, गणेश बोत्रे, विशाल पोतले, सिध्दार्थ कांबळे,बापुसाहेब चौधरी, सरपंच शरद कड, सरपंच सोनल टोपे, सुभाष होले,राम गोरे, चेअरमन दिनेश कड, अनिल कड, प्रमोद कड, रामदास कड, सुदर्शन कड, गुलाब कड, सचिन कड, सुरेश देवकर, हर्षद कड, पदमा कड, तुषार कड, दत्ता कड, नंदकुमार कड, मनोहर कड, पप्पू कड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.