बनकर कुटुंबियांचे समाजासाठीचे योगदान कौतुकास्पद – हभप. निवृत्ती महाराज देशमुख,.
चाकण : प्रतिनिध
अत्यंत गरिबातील गरिबाला सहकार्य व मदत करून दिलासा देणाऱ्या बनकर कुटुंबियांचे समाजासाठीचे सुरू असलेले योगदान खरोखरच प्रशंसनीय व कौतुकास्पद असून पै. पांडुरंग बनकर कुटुंबीयांचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे गौरवउदगार समाज प्रबोधनकार हभप. निवृत्ती महाराज देशमुख यांनी येथे काढले.
ग्रामीण भागातील नागरिकांना सांप्रदायाची आवड निर्माण व्हावी, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून चिंबळी ( ता. खेड ) येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन रुपी सोहळ्यात देशमुख महाराज बोलत होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पै. पांडुरंग बनकर व माजी सरपंच संगीता बनकर यांच्या हस्ते देशमुख महाराज यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र केसरी पै. अशोक मोरे, वस्ताद तानाजी काळोखे, आमदार दिलीप मोहिते, पै. दीपक डोंगरे, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाजी काळे, माजी सदस्य शांताराम सोनवणे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, संचालक माणिक गोरे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, मी सेवेकरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, अमर शिंदे, दत्तात्रय जाधव, बाबा गवारे, तसेच संतोष बनकर, अभिषेक बनकर, सिद्धेश बनकर, संगीता बनकर, अर्चना बनकर, ऐश्वर्या बनकर, रितेश बनकर आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ, महिला, तरुण कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. पांडुरंग बनकर यांच्या कार्याचा गौरव करून देशमुख महाराज यांनी विविध प्रकारचे दाखले देऊन कीर्तन रुपी सोहळ्याची उत्तरोत्तर रंगत वाढवली. तब्बल अडीच तास त्यांनी भाविकांना हसवून हसवून मनोरंजनातून मंत्रमुग्ध केले.
चिंबळी गावचे माजी सरपंच पै. पांडुरंग बनकर यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बनकर कुटुंबीयांनी या कीर्तनरुपी सोहळ्याची जोरदार तयारी केली होती. यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांनी श्रवण सुखाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला.