तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला वृक्षारोपणाचा आनंद.
सत्यविचार न्यूज :
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय व ग्रामपंचायत तिन्हेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तिन्हेवाडी(ता.खेड) येथील त्रिलोकेश्वर मंदीर परीसरात सीताफळ,कडुलिंब, नारळ,जांभूळ, बदाम, अशोक,बांबू,वड, पिंपळ, आपटा अशी एकूण १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील साहेब, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर सचिव हरिभाऊ शेठ सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच परिसरातील वृक्षांचे संवर्धन केले व परिसर स्वच्छ केला.
यावेळी तिन्हेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षा पाचारणे ग्रामपंचायत सदस्य सीमा पठारे, उद्योजक संतोष भाऊ पाचारणे,साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच एम जरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जी. आहेरकर, वाणिज्य विभाग प्रा.डॉ. टी.बी.वेहळे, कला विभाग प्रमुख प्रा. एस. एल. बुरुड, प्रा. एस. एस.देशमुख, प्रा.एस.डी.कदम,प्रा. ए. एच. इनामदार, प्रा. ए. एस.सांडभोर, प्रा.पी.एस.गायकवाड,प्रा. ए. डी. दौंडकर, प्रा. पी. बी. पिंगळे, प्रा. एम. डी. काळे, प्रा.हर्षदा कोळी, प्रा.रुचिका कोकणे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.