आय टी आय प्रवेश प्रक्रिया
तिसरी प्रवेश फेरी : १०ऑगस्ट पासून सुरू
सत्यविचार न्यूज :
राजगुरूनगर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांडोली येथे प्रवेश सत्र २०२४ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून तिसऱ्या प्रवेश फेरीचे प्रवेश दिनांक 10 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत. तरी ज्यांची तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झाली आहे,त्यांनी 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत संस्थेत येऊन प्रवेश निश्चित करावा. प्रवेशाच्या एकूण चार प्रवेश फेऱ्या असतात, आणि सर्वात शेवटी संस्था स्तरावर २७ आणि २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समुपदेशन फेरीच्या माध्यमातून उमेदवारांना शिल्लक जागा गुणवत्तेनुसार बहाल करण्यात येतात.
ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरला नसेल त्यांना २४ ऑगस्ट पर्यंत नव्याने अर्ज करता येणार आहे, जेणेकरून ते उमेदवार समुपदेशन फेरीमध्ये प्रयत्न करून आपला प्रवेश घेऊ शकतील.मशिनिष्ट ग्राइंडर,शीट मेटल वर्कर, टर्नर, पेंटर जनरल, मशिनिष्ट इत्यादी व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांची पसंती मिळत आहे.
आय टी आय मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत
1) आय टी आय मधील प्रशिक्षणार्थीना सरसकट ५०० /- रूपये प्रती महिना विद्यावेतन .
2) संस्थेमार्फत सर्वच ट्रेडससाठी ॲप्रेंटिसशीप तसेच नोकरीसाठी प्लेसमेंट सुविधा उपलब्ध आहे.
3) पुणे जिल्ह्यातील अनेक इंडस्ट्रिज सोबत संस्थेचे नोकरी विषयक करार
4) आय. एम.सी. कोट्यातून प्रवेशाचा शुल्क परतावा .
5) आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना on job training scheme अंतर्गत विविध उद्योगांमध्ये ट्रेनिंग प्रदान करण्यात आले
आहे.
6) संस्थेमध्ये अद्ययावत CNC simulation lab, English communication lab, smart classroom.
7) वसतिगृह सुविधा.
8) आय टी आय मधील कोणताही व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांना विविध उद्योग व आस्थापना मध्ये शासनाकडून 12 हजार ते 17 हजार पर्यंत विद्यावेतन.
9) संस्थेत अभ्यासिका सुविधा.
10) संस्थेतील प्रत्येक व्यवसाय तुकडीसाठी उच्च शिक्षित व अनुभवी निदेशक (शिक्षक) उपलब्ध
11) इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांने आय टी आय. मध्ये दोन वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यास समकक्षतेनुसार
बारावीच्या फक्त दोन विषयाची परीक्षा दिल्यास इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र सुद्धा प्रदान करण्यात येते.
याविषयी अधिक माहिती व मार्गदर्शना साठी संस्थेस भेट द्यावी असे आवाहन मा. प्राचार्य. श्री. यु . के. सुर्यवंशी आणि
आय एम सी. सचिव श्री. के. आर. पवार यांनी केले आहे
बॉक्स (बॉर्डर) मधील matter —
संस्था व्यवस्थापन समिती मधून सुद्धा प्रवेशाची संधी : प्रवेश शुल्क प्रतिपूर्ती (परतावा) योजना
काही उमेदवारांना कमी गुणवत्तेच्या कारणास्तव पसंतीच्या व्यवसायात प्रवेश मिळत नसल्यास त्यांना संस्था व्यवस्थापन समितीच्या राखीव कोट्यातून ठराविक शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करता येतो. पहिल्या चार प्रवेश फेऱ्यापैकी कोणत्याही फेरीमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनी कार्यालयात जमा केलेल्या प्रवेश फी मधील ८० ते १०० टक्के रक्कम उमेदवाराने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आणि शासकीय अटी पूर्ण केल्यास शासनामार्फत परत दिली जाते. तरी IMC मधून प्रवेश करण्यासाठी चौथी प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत भरणे चालू असणार आहे आणि ही IMC मधून प्रवेश आणि शुल्क परतावा योजनेसाठी ही शेवटची संधी असेल. समुपदेशन फेरीमध्ये Imc मधून प्रवेश झालेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.