आम्ही कट्टर शिवभक्त परिवाराकडून रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
आऊसाहेब जिजाऊ यांच्या ४२६ व्या जयंती व श्री शंभूराज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित साधून खेड तालुक्यातील चास येथील सह्याद्री चे शिवभक्त सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत आम्ही कट्टर शिवभक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत हे शिबिर मारुती मंदिर चास (ता.खेड) या ठिकाणी होणार आहे. संयोजक नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत.
आम्ही कट्टर शिवभक्त परिवाराच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर, महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी मदत यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात.
या रक्तदान महायज्ञा बरोबर ऐतिहासिक साहित्याचे व चित्राचे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आम्ही कट्टर शिवभक्त परिवाराच्या वतीने या रक्तदान शिबिरात व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रत्येक रक्तदात्यास पुण्यश्र्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा दिली जाईल.🚩🚩