शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांडोली, खेड येथे रोजगार मेळावा
सत्यविचार न्यूज :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांडोली, खेड आणि Bekaert Pvt Ltd Ranjangaon यांचे संयुक्त विद्यमाने आय टी आय चांडोली खेड येथे रोजगार मेळावा गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे. आय टी आय उत्तीर्ण झालेल्या जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. तसेच Mechanical, Electrical, Production diploma आणि B.Sc. Chemistry च्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
ट्रेडच्या माजी विद्यार्थ्यांनी सदर दिवशी वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहून याचा फायदा घ्यावा तसेच खेड परिसरातील आय टी आय उत्तीर्ण इतरही उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. उदयशंकर सुर्यवंशी आणि आय एम सी सचिव श्री. कमलेश पवार यांनी केले आहे.