सत्यविचार न्यूज :
ईलाईट शाळे मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा ही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला गेला . यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक व तसेच इतर कर्मचारी ह्यांनी एकत्र येत सहभाग नोंदविला.
ह्या वर्षीही पुन्हा पालकांसमोर एक नविन संदेश घेऊन “SHATTER THE SLIENCE ,STOP THE VIOLENCE” हया वर आधारित चांगला स्पर्श व वाईट स्पर्श समाजातील मुलींसाठी ह्या संदेशा मार्फत पालकांना जागृत करण्यात आले तसेच इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
शाळेत सात दिवसाचे गणपती बाप्पा विराजमान झाले होते. प्रत्येक दिवशी आरतीचा मान व प्रसादाचे आयोजन आपल्या शाळेला लाभलेले उत्सुक भावार्थी पालकांना देण्यात आला होता.गणपतीची मूर्ती ही लाल मातीपासून तयार शाडू मातीची असून ,पर्यावरणपूरक नैसर्गिक झाडांचा देखावा संदेशयुक्त घोषणा फलक दर्शवण्यात आले होते. गणपती बाप्पाचे विसर्जन करण्या करीता वाजत गाजत विद्यार्थ्याचें मिरवुकीसह टाळ ,लेझिम नृत्य व ढोल ताश्याच्या गजरात धरणावर नेवून विसर्जन करण्यात आले.
गणपती वसर्जनानंतर बाप्पांचं निरोप घेऊन शाळेमार्फत गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना व पालकांना आपण कशा प्रकारे आपल्या समाजातील मुलींना कसे सुरक्षित ठेवू शकतो ते गणेशोत्सव सण साजरा करून हा सामाजिक संदेश शाळेतर्फे देण्यात आला. या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पल्लवी दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वर्ग, शिपाई, कर्मचारी वर्ग यांनी व ड्राईव्हर कर्मचारी हया सर्वांच्या उपस्थितीने हा भक्तिमय कार्यक्रम पार पाडण्यात आला.