महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा आधारस्तंभ पुरस्कार प्रमिला विकास गोरे यांना प्रदान
सत्यविचार न्यूज :
खेड तालुक्यातील केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चाकण येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला विकास गोरे यांना यावर्षीचा आधारस्तंभ पुरस्कार १५ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर येथे हमीद दाभोलकर, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, बालसाहित्यिक राजीव तांबे, मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मिलींद देशमुख,नंदिनी जाधव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी चाकण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मनोहरबापू शेवकरी, राजगुरूनगर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्याॲड. साधना बाजारे, ॲड. दिपाली वाळुंज आदी उपस्थित होते.
आपणास महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा आधारस्तंभ पुरस्कार दिल्या बद्दल प्रमिला विकास गोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले.