कुरुळी गणेशोत्सवात शालेय मुलांना साहित्य वाटप
सत्यविचार न्यूज :
आळंदी येथील कुरुळी मधील भैरवनाथ मित्र मंडळांने दरवर्षी प्रमाणे विद्युत रोषणाई करुन गणेशोत्सव साजरा करीत आहे. मंडळाने यावर्षी अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.
दरवर्षी पौराणिक देखाव्याचे आयोजन करत होते. मात्र यावर्षी प्लॅस्टर अॅाफ पॅरीसच्या किमंती वाढल्या कारणे तसेच ते न वापरण्याचे धोरण शासनाचे असल्याने यावर्षी पौराणिक देखाव्याचे आयोजन न करता शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
मंडळा तर्फे मुलांसाठी विविध शालेय स्पर्धात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नवनाथ मेमाणे, उपाध्यक्ष. सचिव संजय गायकवाड, सदस्य कैलास आंबले, माणिक काळडोके, मनोज गायकवाड, विशाल सोनवणे, कुणाल आंबले हे उपस्थित होते. मंडाच्या आरतीचा मान उद्योगरत्न व माजी उपसंरपं नितीन कड यांना देण्यात आला. यावेळी उपसरपंच पै. दिपक डोंगरे उपस्थित होते.