एकादशी दिनी आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी
श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट लक्षवेधी
आळंदी येथील परिवर्तिनी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. आळंदी ग्रामस्थ व महिला भाविकांची इंद्रायणी आरतीस मोठी गर्दी झाली होती.
आळंदी मंदिरात भाविकांनी परिवर्तिनी एकादशीस गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आल्याचे आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावून दर्शन घेतले. दुपारचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, कीर्तन, रात्री धुपारती, शेजारती, हरिजागर झाला. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली.
आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस देखील गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे आदींनी बंदोबस्ताचे सुरळीत, सुरक्षिततेसाठी नियोजन केले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून राहत मिळाली. आळंदी पोलिसांनी रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग केलेल्या गाडयांना जॅमर लावून प्रभावी कारवाई करण्यात आली. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.