घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ करत तिचा ( Alandi ) गळा आवळून खून केला. ही घटना रविवारी (दि. 1) पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ येथे घडली.
मच्छिंद्र अर्जुन भारती (वय 26, रा. जांभूळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय प्रल्हाद गिरी (वय 32, रा. मरकळ, ता. खेड. मूळ रा. राजापूर, ता. गेवराई, जि. बीड) आणि त्याची आई (वय 60, रा. राजापूर, ता. गेवराई, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या 28 वर्षीय बहिणीचा आरोपींनी खून केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा आरोपी मच्छिंद्र याच्याशी 14 जुलै 2013 विवाह झाला. विवाहाच्या एक वर्षानंतर मच्छिंद्र आणि त्याच्या आईने फिर्यादी यांच्या बहिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये.
तसेच घरात वापरासाठी नवीन वस्तू घेऊन ये, अशी सातत्याने ते मागणी करीत असे. आरोपींनी फिर्यादी यांच्या बहिणीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. त्यातूनच आरोपी मच्छिंद्र याने फिर्यादी यांच्या बहिणीचा गळा कशानेतरी आवळून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस ( Alandi ) तपास करीत आहेत.