राजगुरूनगर (सिद्धेश कर्णावट – प्रतिनिधी)
राजगुरूनगर शहरात मोठ्या प्रमाणावर वेगळ्या प्रकारे मैत्री दिन साजरा.
आज राजगुरूनगर शहरात मोठ्या उत्साहात फ्रेंड शिप डे साजरा केला गेला.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी संपूर्ण जगात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, त्याचा प्रत्यय आज शहरात अनुभवला गेला. शहरातील जवळपास प्रत्येक फुलवाल्याचे फुल तसेच बुके आज सकाळी ११ वाजेपर्यंत च संपलेले दिसत होते.
शहरातील तिन्हेवाडी येथील त्रिलोकेश्वर मंदिर परिसरात आज १७ वृक्षांचे वृक्षारोपण करून मैत्री दिन साजरा केला गेला. ह्या वृक्षारोपणासाठी तिन्हेवाडीचे सरपंच अरुण थिगळे यांनी मार्गदर्शन करून सहाय्य सुद्धा केले.
ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या सपना यांनी आजवर १०३५ झाडें लावली आहेत.
या अनोख्या उपक्रमात डॉ. रुपाली टाकळकर , मोहन जगदाळे , हितेश कांकरिया, राहुल आरुडे, मच्छिन्द्र पवळे, सुजाता आवटे , संजीव कळमकर , मंगेश बालसराफ , गणेश बघाडे , ज्योती कांकरिया, शैलेश भोसकर , अविनाश आरुडे , अनिल गावडे , संतोष माळी यांनी सहभाग घेतला.