चाकण येथील रोजगार मेळाव्याला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
विशाल ग्रुपचा पुढाकार
चाकण : प्रतिनिधी
चाकण येथील विशाल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजनभाई परदेशी व विशाल ग्रुपच्या वतीने चाकण येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला खेड तालुक्यातील कामगारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात अत्यंत गरीब व गरजू युवकांना ऑन दी स्पॉट रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उद्योजक राजनभाई परदेशी यांनी दिली.
येथील मार्केटयार्ड जवळील विशाल टायर्सच्या भव्य दालनात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते आणि उद्योजक चंद्रकांत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी उद्योजक राजनभाई परदेशी, संपर्क प्रमुख भगवान मेदनकर, भाजपचे खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, खेड पंचायत समितीचे माजी सदस्य अमृत शेवकरी, ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाबराव खांडेभराड, सुर्यकांत बारणे, एड. प्रीतम शिंदे, संदेश जाधव, राजेंद्र खरमाटे, अजय जगनाडे, धीरज मुटके आदि उपस्थित होते.
दहावी, बारावी पास, आयटीआय, सर्व ट्रेड, डिप्लोमा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल, बीई मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, बीएससी, बी. कॉम. ही पदवी असणाऱ्या अठरा ते तीस वयोगटातील युवकांना या मेळाव्यात मुलाखतीतून ऑन द जॉब रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आली.
उद्योजक चंद्रकांत परदेशी व विजय परदेशी यांनी स्वागत केले. उद्योजक महेंद्र परदेशी यांनी प्रास्ताविक केले. संदेश जाधव यांनी सूत्रसंचालन, तर राजनभाई परदेशी यांनी आभार मानले. राजनभाई परदेशी मित्र परिवार व विशाल ग्रुप यांच्या वतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.