के. टी .ई .एस .च्या इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीतून साकारले विठ्ठल नाम
“विठ्ठल नामाची शाळा भरली,
शाळा शिकताना तहानभूक हरली “.
खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्रजी माध्यम विद्यालया मध्ये शनिवार दिनांक. १३/७/२०२४रोजी आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते . संस्थेच्या संचालिका मा. सौ उर्मिलाताई सांडभोर. व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका , पर्यवेक्षिका ,सर्व शिक्षक वृंद यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करून दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.
इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची राजगुरुनगर गावातून विठ्ठल नामाच्या जयघोषात लहानग्यांची पायी दिंडी निघाली,सर्व राजगुरुनगरवासीय टाळ मृदुंगाच्या गजरात व चिमुकलांच्या विठ्ठलं भक्तीत तल्लीन झाले.यानंतर इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी रिंगणातून माऊली नाव साकारले.
आणि पारंपारिक दिंडी नृत्य केले, फुगडी खेळली. तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी टाळ नृत्य केले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पावलीच्या तालावर सुंदर असे विठ्ठल नाम साकारले. विठ्ठल, माऊलीच्या जयघोषात जुनिअर व सिनिअर के.जी.चे बालवारकरी तल्लीन झाले. टाळ ,मृदुंग चिपळीच्या तालावर मोठ्या जल्लोषात प्राथमिक विभागाची दिंडी साजरी झाली.विठ्ठलाच्या भक्तीत सर्व शिक्षक ,विध्यार्थी एकरूप झाले. अशा प्रकारे भक्तीमय वातावरणात विठू नामाच्या गजरात इंग्रजी माध्यम विद्यालयात दिंडी सोहळा संपन्न झाला.