पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चाकण येथे वृक्षारोपण
चाकण : प्रतिनिधी
प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण वाचवा हा अनोखा संदेश देत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ चाकण येथे वृक्षारोपण करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे चाकण भागात कौतुक होत आहे.
येथील प्रगतशील शेतकरी व कांदा – बटाट्याचे प्रसिध्द व्यापारी सुदाम मलीभाऊ गोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी म्हणून गोरे कुटुंबियांच्या वतीने शेतात वृक्षारोपण आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चाकण शहराध्यक्ष राम गोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिजाबाई गोरे, ओम गोरे, अभिषेक आल्हाट, ओजसवी गोरे, अनिकेत भुजबळ, रोहन भुजबळ, विनायक भुजबळ, प्रमोद ताम्हाणे, मयूर ताम्हाणे, सौरव भास्कर, वरूण जाधव, यज्ञेश गोरे, सर्वेश गोरे, रुद्रा गोरे, प्रशांत वाघोले, सुयोग शिंदे, शंतनू जाधव, सुजय शिंदे, संस्कार दरवडे, गोपाळ गोरे, पुष्कर भास्कर, गौरव जाधव आदि उपस्थित होते. राम गोरे यांनी यावेळी सांगितले की,” वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात लावण्यात आलेल्या वृक्षांची आमचे कुटुंबीय विशेष काळजी घेणार आहे. या अनोख्या उपक्रमाचा इतरांनी आदर्श घ्यावा.”