स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव दिनी वृक्षारोपण
देहू नगरीत पर्यावरणाचा संदेश
सत्यविचार न्यूज :
आळंदी येथील वृक्षदाई संस्थेच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांचे जन्मोत्सवा निमित्त जन्मोत्सव महापुरुषांचा संकल्प पर्यावरण संवर्धनाचा या संकल्पनेतून महापुरुषांच्या जयंती निमित्त देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. छत्रपती शंभुराजे यांच्या ३६७ व्या जयंती निमित्त देहू तील जलशुद्धीकरण केंद्र येथे वड, पिंपळ, कडूलिंब, औदुंबर, अर्जुन, ताम्हण, बहावा अशा ३२ देशी वृक्षांचे रोपण व्याख्याते तथा प्रवचनकार ह. भ. प. गणेश महाराज शिंदे, बांधकाम व्यावसायिक गोपालक शिवाजी शिऊडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण उत्साहात करण्यात आले.
या प्रसंगी देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पुजा दिवटे, संस्थेचे अध्यक्ष ह.भ. प. शिवाजी मोरे महाराज, देहू नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात, संग्राम पाटील, अमोल गाडेकर, सुभाष पाटील, महेश चौधरी, केदार शिंदे, राकेश वाघमारे, सुनील निंभोरकर, विकास बोराडे, सुनील सरवळे, हंसराज लांजेवार, मंगेश घुरुडे, अमित चौधरी, मच्छिंद्र गवळी आदीसह वृक्षप्रेमी उपस्थित होते.
सर्वत्र वाढते तापमान रोखायचे आहे. यासाठी जागतिक पर्यावरण संस्था स्टडी इन द जनरल ऑफ नेचर यांच्या मूल्यांकना नुसार पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. यामुळे प्रतिव्यक्ती ४२३ वृक्ष पृथ्वी तलावर असणे गरजेचे आहे. भारतामध्ये याचे प्रमाण प्रति व्यक्ती २८ वृक्ष असे आहे. यामुळे साधू संतांचे महापुरुषांचे असे कोणतेही निमित्त साधून वृक्षारोपण करणे हि काळाची गरज आहे. तसेच यासाठी वृक्ष यांचे संवर्धन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. प्रवचन व व्याख्यानातून गणेश शिंदे यांनी ही पर्यावरणा विषयी जनजागृती करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ह.भ. प. शिवाजी मोरे महाराज यांनी केले.
गणेश महाराज शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शहाजी महाराज व शंभूराजे यांचे पर्यावरणाशी अतूट नाते होते. या बाबतचे दाखले देत आपण ही या संस्थेचा एक भाग बनू आणि पर्यावरणासाठी चांगल्या पद्धतीने योगदान देऊ असे सांगितले. यावेळी सचिव संतोष हगवणे, देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पुजा दिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष पाटील यांनी केले.