रेपको होम फायनान्सच्या चाकण शाखेचे दिमाखात उदघाटन,
चाकण : प्रतिनिधी
चाकण येथे रेपको होम फायनान्स लिमिटेड या शाखेचा मोठ्या दिमाखात उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चीफ बिझनेसचे ऑफिसर एम राजा, सर व्यवस्थापक सेलवाकुमारसमी एम, सजीव सुब्रमणियन, रामा हांडा, ऍड. अतुल घुमटकर, ऍड. सतीश अहिरे, प्रदीप महाजन, मंगेश सोनवणे आदि मान्यवर व सर्व कर्मचारी, डीएसए व ग्राहक उपस्थित होते. रेपको होम फायनान्स लिमिटेडचे शाखा अधिकारी मधुकर बिरादार यांनी प्रास्ताविक केले. गृहकर्ज योजना, त्वरित गृहकर्ज मंजुरी व आकर्षक व्याजदर याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.