भालचंद्र पिंगळे यांचे निधन,
चाकण : प्रतिनिधी
चाकण येथील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र उर्फ दाजी शंकर पिंगळे ( वय – ५० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, एक भाऊ, पाच बहिणी, दोन भाऊजया असा परिवार आहे. येथील युवा उद्योजक हार्दिक व सर्वांग पिंगळे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चाकण येथील चक्रेश्वरच्या वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.