शहीद दिनानिमित्त महान गाव निघोजे येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन.
सत्यविचार न्युज :
शहीद दिनानिमित्त महान गाव निघोजे येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेला हार, पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारत मातेचे वीर सुपुत्र भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांना आजच्याच दिवशी इंग्रजी सरकारने फाशी दिली होती. त्यांचा बलिदान दिवस आज देशभरात शहीद दिन (Shaheed Din) म्हणून साजरा केला जातोय.
भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव म्हटल्यानंतर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्रयिचा एक चेहरा येतो. त्यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवसाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतोय.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं आहे. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव त्यातील अग्रणी. इंग्रजी सरकारच्या ‘पब्लिक सेफ्टी बिल अॅन्ड ट्रेड डिस्ट्रिब्यूशन बिल’ च्या विरोधात भगतसिंहांनी सेट्रंल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं.
लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या. नंतर या प्रकरणाचा ठपका ठेऊन भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची अंमलबजावणी 23 मार्च 1931 साली करण्यात आली. हाच दिवस देशात शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतोय.
ग्रामपंचायत निघोजे येथे शहिद दिनी क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनिता कैलास येळवंडे, उपसरपंच दत्ता आंद्रे, ग्रामपंचायत सदस्य समाधान येळवंडे, सागर येळवंडे, दिपक कांबळे, कोडीभाऊ येळवंडे, इंदिरा फडके, अलकाबाई येळवंडे, ग्रामस्थ व आदी मान्यवर उपस्थित होते.