सत्यविचार न्यूज :
आळंदीत एन.पी.सी.आय.एल. मुंबई तर्फे स्वच्छतेचा जागर
आळंदी येथील आळंदी कार्तिकी यात्रा श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोडल्याचे सांगता दिनी आळंदीत श्रींची छबिना मिरवणूक होत असते. त्या पूर्वी पालखी मार्गाची स्वच्छता करण्यासाठी वारकरी सेवा संघाचे वतीने विविध सेवा भावी संस्थांचे सहकार्याने आळंदीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात भारत सरकारच्या एन.पी.सी.आय.एल. मुंबई येथील ५० कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त पणे स्वच्छता अभियान मध्ये आपला सहभाग घेत अभियाना अंतर्गत मंदिर परिसर, इंद्रायणी घाट येथे प्रामुख्याने स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमास एन.पी.सी.आय.एल. व्यवस्थापन, स्थानीय लोकाधिकार समिती मुंबई यांचे सहकार्य तसेच वारकरी सेवा संघ (महाराष्ट्र), अध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांनी मार्गदर्शन केले.