आळंदी माऊली मंदिरात हरिनाम गजरात होलिकोत्सव
सत्यविचार न्युज :
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरासह शहरातील विविध मठ, मंदिर आणि घराघरांसमोर प्रथा परंपरांचे पालन करीत रविवारी ( दि. २४ ) धार्मिक मंगलमय वातावरणात होलीकोत्सव हरिनाम गजरात साजरा करण्यात आला. आळंदी परिसरात धुलवड दिनी सोमवारी ( दि. २५ ) पाणी वाचवा संदेश देत इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट तर्फे इंद्रायणी नदी घाटावर संदेश देत धुलिवंदन दिनी महाआरती होणार आहे.
माऊली मंदिरात नागरिक, भाविक, दर्शनार्थी यांची श्रीचे दर्शनासह होळी पूजन करण्यास मोठी गर्दी केली होती. यात महिला आणि मुलांची गर्दी लक्षणीय होती. यावर्षी होळी पूजन रविवारी आल्याने नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. अजानवृक्ष प्रांगणात होळी पूजन वेदमंत्र, हरिनाम जय घोषात पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, बाळासाहेब चोपदार, सेवक कर्मचारी साधक, भाविक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरातील प्रथांचे पालन करीत हरीनाम गजरात मंदिरात होळी पूजन झाले. यावेळी व्यवस्थापक माऊली वीर यांचे सह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. होळी पूजन वेदमंत्र, नामजयघोषात झाल्या नंतर होळी प्रज्वलीत करण्यात आली. महिला भाविक, मुले, नागरिकानी होळीस प्रदक्षिणा करीत नैवेद्य अर्पण करण्यास गर्दी केली.
माऊली मंदिरातील प्रथेप्रमाणे सेवक भीमराव वाघमारे यांच्या वतीने सनई चौघड्यांचे वादनाने मंत्र मुग्ध वातावरणात होलिकोत्सव अर्थात होळी सण संस्कृतीची जोपासना करीत आळंदी पंचक्रोशीत साजरा करण्यात आला. आळंदी पंचक्रोशीसह शहरात सर्वत्र होळी सण पारंपारिक रीतीने उत्साहात साजरा करण्यात आला. होळी पूजे नंतर पुरण पोळीचा महानैवेद्याचा महाप्रसाद वाढविण्यास परिसरातून मोठी गर्दी झाली होती. आळंदी शहरातील नागरिक माऊली मंदिरात होळीस नारळ प्रसाद, नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रींचे दर्शनास गर्दी होणार असल्याने श्रीचे दर्शन व्यवस्थेचे नियोजन प्रभावी करण्यात आले होते. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचेसह देवस्थानचे सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
होलिकोत्सव दिनी इंद्रायणी नदी घाटावर दैनंदिन इंद्रायणीच्या महाआरती इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट चे वतीने अध्यक्ष अर्जुन मेदनकर, अनिल जोगदंड, नितीन ननवरे, दिनकर तांबे, उपाध्यक्ष राहुल चव्हाण, गोविंद ठाकूर, सेवक महारुद्र हाके आदींसह भाविकांचे उपस्थितीत धार्मिक मंगलमय वातावरणात झाली. तात्पुरवे इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करण्यात आली.
ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिर, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत हरिनाम गजरात परंपरेने होळी सण साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे संस्थेतील साधक विद्यार्थ्यानी होळी साजरी करण्यास परिश्रम घेतले. येथील गोपाळपुरातील ज्ञानाई माधुकरी अन्नछत्र मध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. मधुकरी वाटप केंद्रातील साधकांना पूर्ण पोळीचा महाप्रसाद वाटपकरण्यात आला. आळंदीत राहून शालेय शिक्षण बरोबर वारकरी शिक्षण घेत असलेल्या वारकरी साधक मुलांना येथे दैनंदिन मधुकरी वाटप केली जाते. यासाठी रामेश्वर महाराज मायकर विशेष परिश्रम घेत आहेत.
धुलवड दिनी सोमवारी ( दि. २५ ) पाणी वाचवा संदेश देत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी दिली. ते म्हणाले, पाण्याचा वापर न करता विविध रंगी रंग एकमेकांना लावत धूलिवंदन साजरे करावे. यातून पाण्याची बचत करण्यासह प्रदूषण मुक्त धुळवड साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.