Pune : पुण्याचे कमाल तापमान 38 अंशावर, उन्हाचा चटका अन घामाच्या धारांनी नागरिक हैराण
सत्यविचार न्यूज –
पुण्यात आता थंडीने (Pune) काढता पाय घेतला असून उन्हाच्या झळा मात्र जाणवत आहेत. पुणे शहरात शुक्रवारी लोहगाव, मगरपट्टा, शिवाजी नगर या परिसरातील पारा 37 ते 38 अंशाच्या दरम्यान गेला होता. त्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा व उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहर आणि परिसरात मागील चार दिवसांपासून कमाल-किमान तापमानात वाढीचा कल कायम आहे. पुढील आठवडभर कमाल – किमान तापमानात वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. शहराच्या उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
शुक्रवारी शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये –
शिवाजीनगर, लोहगाव – 37.5
मगरपट्टा – 38.1
पाषाण – 37.4
लवळे – 38.7 (Pune)
वडगाव शेरीत सर्वाधिक 24.9
लवळे, मगरपट्टा 24
कोरेगाव पार्क 22.9
हडपसर 22.1
खेड 22
शिवाजीनगर 18.5
पाषाण 19.3
लवासात 19
हवेलीत 16
हवामान विभागाने पुढील चार दिवसांत किमान तापमानात 0.5 ते 1.0 तर कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.