उष्माघात वाढतोय, काळजी घ्या…
शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
सत्यविचार न्युज :
उपाय—
◼️नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
◼️अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
◼️उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
◼️उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
◼️हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
◼️माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
◼️पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
◼️आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
◼️सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
◼️प्रत्येक काम सावकाशच करा.
◼️जेवतेवेळी मधे मधे एक दोन वेळा थोडे पाणी प्यावे.
◼️ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
◼️खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
◼️जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
◼️दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
◼️रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
◼️उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
आपल्या शरीरास थंड करणारे पदार्थ खालील प्रमाणे….
कलिंगड – थंड
सफरचंद – थंड
चिकू – थंड
लिंबू – थंड
कांदा – थंड
काकडी – थंड
पालक – थंड
टॉमेटो कच्चा – थंड
कोबी – थंड
गाजर – थंड
मुळा – थंड
कोथिंबीर/पुदिना – थंड
भेंडी साधी भाजी – थंड
बीट – थंड
बडीशेप – थंड
वेलची – थंड
डाळींब – थंड
ऊसाचा रस (बर्फ न घालता) – थंड
नारळ (शहाळ) पाणी – थंड
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) – थंड
मीठ – थंड
मूग डाळ – थंड
कॉफी – थंड
शेवगा उकडलेला – थंड
ज्वारी – थंड
दूध, दही, तूप, ताक (फ्रिज मधले नाही) – थंड
माठातील पाणी – थंड
एरंडेल तेल – अती थंड
तुळस – थंड
तुळशीचे बी – उत्तम थंड
सब्जा बी – उत्तम थंड
नीरा – थंड
मनुका – थंड
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) – थंड
✅ उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो….
आपल्या शरीरास उष्ण ठेवणारे पदार्थ….
पाव/खारी/ बिस्कीट – उष्ण
हॉट ड्रिंक सर्व – उष्ण
कोल्डरिंग सर्व – उष्ण
मास/चिकन/मटण – उष्ण
बाजरी/नाचणी – उष्ण
आईस्क्रीम – उष्ण
श्रीखंड/आम्रखंड – उष्ण
मध – उष्ण
पनीर – उष्ण
पपई – उष्ण
अननस – उष्ण
वांगे – उष्ण
गवार – उष्ण
मिरची – उष्ण
मका – उष्ण
मेथी – उष्ण
कारले – उष्ण
बटाटा – उष्ण
आलं / लसूण – उष्ण
संत्री – उष्ण
आंबा – उष्ण
तूर डाळ – उष्ण
चणा डाळ – उष्ण
गुळ – उष्ण
तिळ – उष्ण
शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर – उष्ण
हळद – उष्ण
चहा – उष्ण
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण