स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय -चाकण मध्ये स्काऊट गाईड आणि एनसीसी मार्गदर्शन शिबीर संपन्न,
सत्यविचार न्युज-
दि.०६/०२/२०२४,वार- मंगळवार रोजी स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चाकण तसेच भामा इंग्लिश मीडियम स्कूल चाकण या शालेय प्रांगणामध्ये स्काऊट गाईड व एनसीसी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये एनसीसी आणि स्काऊट गाईड तज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी एनसीसीचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.एनसीसी व स्काऊट गाईडचे भविष्यातील फायदे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.हे मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शकुंतला झगडे मॅडम, सौ.हिवराळे मॅडम, सौ.जाधव मॅडम उपस्थित होत्या.
हिवराळे मॅडम यांनी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. हात धुत असताना आपण कोणत्या पद्धतीने धुवायला पाहिजे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमास विद्यालयाचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिलाताई गोरे, भामा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरीताई गोरे तसेच दोन्ही विद्यालयाचे शिक्षक वृंद कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मळेवाडी सर यांनी केले व आभार प्रदर्शन भालेराव मॅडम यांनी केले.