राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी ॲड.ज्ञानेश्वर भोसले यांची नियुक्ती
सत्यविचार न्युज-
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते ॲड. ज्ञानेश्वर भोसले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी महाळुंगे ता.खेड येथील ॲड.ज्ञानेश्वर भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र देखील त्यांना देण्यात आले आहे.
सदर नियुक्ती पत्रात असे नमूद करण्यात आले आहे कि, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, अशी अपेक्षा करण्यात आली आहे.
वरिष्ठांनी टाकलेला विश्वास ते निश्चितपणे सार्थ करतील व आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून साहेबांच्या विचारांचे जास्तीत जास्त सदस्य, उमेदवारांना सहकार्य करून भविष्यामध्ये राष्ट्रवादी ग्रामीण भागामध्ये रुजविण्याचे काम ते करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देणारा असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे असे निवडीनंतर सत्यविचार शी बोलताना ॲड.ज्ञानेश्वर भोसले यांनी सांगितले.
निश्चितपणे भविष्यात शरद पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवून राष्ट्रवादीची पाळेमुळे खेडोपाडी वाड्यावर पोचविण्यासाठी सर्वतोपरी काम करून टाकलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष ॲड.ज्ञानेश्वर भोसले यांनी सांगितले.
निवडीनंतर उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूबभाई शेख, महिला प्रदेश उपाध्यक्षा राजमालाताई बुट्टे पा, पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, युवक अध्यक्ष स्वप्नीलभैय्या गायकवाड, कार्याध्यक्ष प्रमोद गोताराने, खेड तालुका अध्यक्ष हिरामण अण्णा सातकर, खेड तालुका महिला अध्यक्षा श्रद्धाताई सांडभोर, युवक अध्यक्ष ॲड. विशाल झरेकर, मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकारणी सदस्य जीवन मिंडे,,संतोष इंगळे इनामदार, विशाल जाधव, गणेश शिवळे पा, संजय गायकवाड, विनय वाळके, विनायक बर्गे, समीर भोसले, अनिकेत फलके, नवनाथ जाधव, आकाश बर्गे चाकण शहर अध्यक्ष प्रशांत गोरे, हरिप्रसाद खळदकर आदी मान्यवर उपस्थित होते.