पांडुरंग उत्सवानिमित्त कडूसला हरिनाम सप्ताह
सत्यविचार न्युज –
कडूस येथील श्री पांडुरंग उत्सव सोहळ्यानिमित्त गंगाजीबुवा मवाळ धर्मशाळेत रविवार (दि. १८) ते रविवार (दि. २५) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संतोष ढमाले, बाळासाहेब ढमाले, सचिव चांगदेव ढमाले यांनी दिली.
सप्ताहात दररोज कीर्तन, काकड आरती, गाथापारायण, नियमाचे भजन, प्रवचन, हरिपाठ, परिसरातील भजन मंडळाचा रात्री हरिजागर होणार आहे. रविवारी (दि. २५) सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन व दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. भूषण पारखी, शिरीष मवाळ, पुष्कराज मवाळ, हषीकेश मवाळ, विनायक सुमंत, बबन मेदगे, दामूशेठ बंदावणे यांच्या हस्ते वीणापूजन करून सप्ताहाची सुरुवात होणार आहे. कलशपूजन सुदाम महाराज मुसळे, विश्वास पाठक, ह.भ.प. परिणिती शिंदे, सविता गारगोटे, ह.भ.प. गिरीश शेंडे, माऊली खंडागळे यांच्या हस्ते होणार आहे. टाळ-पखवाजपूजन पंडित नेहेरे, कांता गोडसे, अण्णा हिरवे, सीताराम नेहरे, प्रताप गारगोटे, बाळासाहेब ढमाले यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथपूजन ह.भ.प. लक्ष्मण मुसळे, बंडू नेहेरे, ललित मोहळे, कुमार हिरवे, गोविंदनेहेरे, नामदेव ढमाले यांच्या हस्ते होणार आहे. गाथापारायण ह.भ.प. सुदाम मुसळे, दगडू नेहेरे, मारुती पडवळ, अण्णा शिंदे, पांडुरंग कृपा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने होईल, दिंडीमालक फक्कड पितांबरे, बबन शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. सप्ताहात ह.भ.प. एकनाथ महाराज शिंदे, ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ह.भ.प. पांडुरंग महाराज साळुंके, ह.भ.प आत्माराम महाराज शास्री, ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांची कीर्तनसेवा होईल. रविवारी (दि. २५) ह.भ.प. संतोष महाराज काळोखे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
पांडुरंग उत्सवानिमित्त पवित्र कुमंडला नदीपात्रात स्नानावेळी दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येणार आहे. एकादशीच्या दिवशी गर्दीची शक्यता असल्याने कडूस बसस्थानक ते मंदिर रस्त्यावर सुरक्षारक्षकांची नियुक्ती, दर्शनरांगेची व्यवस्था, विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी पुणे तसेच राजगुरुनगर येथून एसटी बस सोडण्यात येणार आहेत.