दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या नाम घोषात महाळुंगे येथे अखिल आदिवासी बांधवांची श्रीपती सेवा संघ पायी दिंडी सोहळ्याचे आज नारायणपूर कडे प्रस्थान झाले आहे. संपूर्ण महाळुंगे नगरीत दत्त नामाचा जयघोष झाला. श्री दत्त जयंती चे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे निघणारा श्री क्षेञ महाळुंगे ते श्री क्षेञ नारायणपुर येथे निघणारा पायी दिंडी सोहळा या वर्षी शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर रोजी मार्गस्थ झाला आहे. श्रीपती सेवा संघ अखिल आदिवासी समाज बांधव व दत्त सेवेकरी मंडळ महाळुंगे खेड नारायणपुर भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडत असुन या सोहळ्याचे हे ११ वे वर्षे आहे.सोहळ्याचा चार दिवसाचा कालावधी असुन आळंदी, हडपसर, दिवे घाट, सासवड,नारायणपुर या ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहे. २५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता दिंडी सोहळा नारायणपुर येथे पोहचणार आहे. विश्व चैतन्य सदगुरु नारायण महाराज यांच्या अधिपत्याखाली होणारा हा भव्य दत्त जन्मोत्सवया या सोहळ्याचा आनंद आदिवासी बांधव घेणार आहेत. सोहळ्याचे आयोजन दत्तसेवेकरी मंडळ व आखिल आदिवासी ठाकर समाज महाळुंगे हे करते. नियोजन श्रीपती सेवा संघ महाळुंगे करते. ह्या दिंडी च्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात ठाकर समाज एकवटला जातो व समाजाला व आदिवासी बांधवांना एक वेगळी दिशा लागते. धावपळी च्या युगा मध्ये हा समाज व्यसनाच्या जादा आहारी गेला आहे विखुरलेला समाज एकत्र यावा व व्यसनांपासून दूर राहावा या समाजाला एक वेगळे वळण लागावे म्हणून विश्व चैतन्य सदगुरु नारायण महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने हा दिंडी सोहळा चालू करण्यात आला आहे. या दिंडीच्या माध्यमातून हा समाज एकत्र येत आहे दिंडी मध्ये प्रतिवर्षी संख्या हळू हळू वाढत आहे. व दिंडीचा आनंद घेत आहे.