आळंदी मंदिरात एकादशी दिनी लक्षवेधी पुष्प सजावट
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात भागवत एकादशी दिनी लक्षवेधी पुष्प सजावट श्रींचे गाभाऱ्यात करण्यात आली होती. भाविकांनी दर्शनास गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले.
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे वैभवी गाभाऱ्यात विविध रंगी आकर्षक फुलांचा वापर करीत पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरात भागवत एकादशी निमित्त खिचडी महाप्रसाद वाटप आळंदी देवस्थान तर्फे वाटप करण्यात आले. आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा भाविकांनी गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासत तीर्थ प्राशन केले. वारकरी भाविकांनी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा करीत भागवत एकादशी साजरी केली. येथील इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट तर्फे इंद्रायणी नदी घाटावर दैनंदिन इंद्रायणी आरतीचा उपक्रम सुरु असून भोलापुरीजी महाराज यांचे हस्ते संत गाडगेबाबा यांचे पुण्यतिथी निमित्त नदी घाटावर स्वच्छता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आहे आहे. यावेळी इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, उपाध्यक्ष राहुल चव्हाण, सचिव भोलापुरीजी महाराज, ज्ञानेश्वर घुंडरे, माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर उर्फ बापू कुऱ्हाडे, गोविंद ठाकूर पाटील, साहेब भुरे, सचिन महाराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी हरित आळंदीला जनजागृती करण्यात आली. इंद्रायणी नदीत निर्माल्यादी वस्तू, कपडे कचरा, तुटलेले फोटो, काचा न टाकण्याचे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले.