सत्यविचार न्यूज :
मी सेवेकरी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील पन्नास गावात मोफत महाआरोग्य शिबिरास सुरवात
16 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार महाआरोग्य शिबिर तसेच मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन व जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान शिबिरा चे सुद्धा आयोजन
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचा उपक्रम
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्यवारी नेण्याचा संकल्प करत मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीनं मोफत महाआरोग्य शिबीर तसेच महारक्तदान शिबीर सुरु करण्यात आले आहे.
तालुक्यातील काळूस गावात मी सेवेकरी सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांच्या उपस्थित या शिबिराची सुरवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोमनाथ मुंगसे, विशाल झरेकर, हरिप्रसाद खळदकर, सरपंच शंकर जैद, रोहिदास पवळे, मोहन पवळे, पवनराजे जाचक, विश्वनाथ पोटवडे, दत्ता मोरे, संतोष खलाटे, भरतशेठ अरगडे, अनिलशेठ अरगडे, अनिल टोके, आकाश नर्भे आदी उपस्थित होते.
१६ ऑक्टोबर पर्यत तालुक्यातील काळूस, खरपुडी, शिवे, चास, पाईट, दावडी, तुकाई भांबुरवाडी, टाकळकरवाडी, कन्हेरसर, तिन्हेवाडी, वाडा, कुरकुंडी,कडूस, कोयाळी, बहुळ दोंदे या गावात तसेच परिसरातील गावामध्ये हे महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर होणार आहे. तसेच आजूबाजूच्या गावामधुन शिबिरास येण्यासाठी मोफत गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
या शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणीसह रक्त, लघवी, ई. सी. जी., नेत्ररोग, कॅन्सर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आदी तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच शासकीय योजनांची माहिती आणि आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी ही करुन दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याला 5 लाखाचे विमा सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे. जास्तीतजास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुधीर मुंगसे यांनी केलं आहे.