प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये 2025 निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्यविचार न्यूज :
राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल व वाहतूक सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी चिंचवड शहरात निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. तरी पिंपरी चिंचवड मधील युपीएससी, एमपीएससी, स्पर्धापरीक्षा देणारे विद्यार्थी, पदवीधर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच निवृत्त शासकीय, अशासकीय व्यक्ती निबंध स्वरूपात आपल्या संकल्पना पाठवू शकतात.
पिंपरी चिंचवड शहरातील निबंध प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी व वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे यांनी केले आहे.
निबंधाचे विषय खालील प्रमाणे आहेत. खालील विषयास अनुसरून निबंध ६०० शब्दांमध्ये असावा.
१) स्वराज्य व सुशासन
२) नाविन्यपूर्ण विकास योजना
३) रस्ता सुरक्षा व शहरी वाहतूक
४) शैक्षणिक संरचना आणि पद्धती
५) सांस्कृतिक क्रीडा व युवक विकास
६) अक्षय ऊर्जा व पर्यावरण
७) झोपडपट्टी पुनर्वसन
प्रथम 50 स्पर्धकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाईल. तर सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येईल.
संपर्क : ९७३०७०२१००/९३२६३५२७२८
आपल्या निबंध/संकल्पना प्रत्यक्ष अथवा पोस्टाने खालील पत्त्यावर 24 जानेवारी 2025 पूर्वी पाठवावे अशी विनंती.
पत्ता : वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ए विंग, शॉप नंबर 30, जुने आरटीओ ऑफिस, पूर्णानगर, चिंचवड, पुणे-19.