खेडची जागा ही शिवसेनेचीच, शिवसेना ताकदीने निवडणूक लढणार – रामदास धनवटे
राजगुरूनगर |
काळूस – सांडभोरवाडी जिल्हा परिषद गटात आज (दि. १४) रोजी दहा गावांमध्ये शिवसेना शाखांच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. काल (दि.१३) रोजी माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शुभहस्ते खेड तालुक्याच्या येलवाडी गावातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा नाम फलकाचे अनावरण करण्यास सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने आज तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांच्या शुभहस्ते पाडळी येथून शाखेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यास सुरुवात झाली यावेळी बोलताना धनवटे यांनी विश्वास व्यक्त केला की, खेडची जागा ही शिवसेनेचीच, शिवसेना ताकदीने निवडणूक लढणार त्यासाठी मतदार संघातील गावागावातील शिवसैनिक सज्ज झालेला आहे.
तालुक्यात खरी लोकशाही राहिली नाही आशा परिस्थितीत केवळ शिवसेना हाच एक एकमेव पर्याय सामान्य जनतेसमोर उरतो, अन्याच्या विरोधात लढा देण्यासाठी शिवसेना पक्ष नेहमीच एक पाऊल पुढे जाऊन कार्यरत आहे. असे सूतोवाच देखील धनवटे यांनी केले. त्याचबरोबर काळूस – सांडभोरवाडी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांनी देखील या मतदारसंघात पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असल्याचा विश्वास व्यक्त केला तर वाडीवस्तीवरील प्रत्येक सर्वसामान्य माणूस या हुकूमशाहीच्या विरोधात पेटून उठला आहे. या तालुक्याच्या विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्यांना आता घरी पाठवण्याची वेळ आली असल्याचे नमूद केले.
दरम्यान पाडळी, पांगरी, बुट्टेवाडी, काळेची वाडी, कोहीनकरवाडी, राक्षेवाडी, ढोरेवाडी, होलेवाडी, मांजरेवाडी, मलघेवाडी या गावांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाक्षाच्या या शाखा नाम फलक अनवरणाच्या या दौऱ्यामध्ये राजगुरूनगर परिसरात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी हजेरी लावली. बाबाजी काळे यांच्या समर्थकांच्या चारचाकी वाहनांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी उप जिल्हा प्रमुख शिवाजी राजे वर्पे, तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजीसेठ काळे, तालुका समन्वयक अमोलदादा पवार, संचालक बाजार समिती सोमनाथ मुंगसे, जिल्हा नेत्या विजयाताई शिंदे, तालुका संघटक उर्मिला ताई सांडभोर, सोनवणे ताई, शहर प्रमुख दिलीप तपकिर, उप तालुका प्रमुख सुभाष मंडेकर, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख बाळासाहेब ताये, सचिन पाचपुते, जेष्ठ नेते विश्वासराव नेहरे, अमोल पाचपुते, नितीन रायकर, सुदाम कराळे, दत्ताभाऊ सातपुते, सरपंच काळेचीवाडी राजू सातकर, मा. सरपंच शशिभाऊ काळे, संदीप ढोरे, शेतकरी नेते एल बी तनपुरे, उपविभाग प्रमुख राहुल मलघे, उपविभाग प्रमुख राजू चौधरी, देवराम वाडेकर यांसह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
या भागाचा विकास करण्यासाठी गेले अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करणारे बाबाजीशेठ काळे हे इच्छुक उमेदवार आहेत, पक्ष आगामी काळात कोणाला उमेदवार हा भाग नंतर आहे, परंतु बाबाजीशेठ यांनी केलेल्या विकासाचे कौतुक करणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. – विजया शिंदे (जेष्ठ नेत्या शिवसेना, उबाठा- खेड)