गणेशोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन
सत्यविचार न्यूज :
श्रीक्षेत्र महाळुंगे येथील शिवम ग्रीन कोर्ट मित्र मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी गणेशोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
श्री क्षेत्र महाळुंगे येथील शिवम ग्रीन कोर्ट मंडळाने या गणेशोत्सवामध्ये भरगच्च, सार्वजनिक, व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नवनवीन विषय घेऊन मंडळ विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणारे उपक्रम, तसेच सामाजिक अतिशय प्रेरणादाई उपक्रम या मंडळाने सुरु करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला.
चित्रकला स्पर्धेला उत्कृष्टपणे विद्यार्थी पालक व गणेश भक्तांनी साथ दिली आहे.
लहान चिमुकल्यांनी आणि अतिशय सुंदरपणे गणपतीच्या चित्राल रंगभरण केले व मोठ्या मुलांनी पर्यावरण संवर्धन विषयी माहिती देणारे चित्र काढून चित्र रंगवले व जनजागृती त्या माध्यमातून केली. या स्पर्धेमुळे मुलांमध्ये पर्यावरण विषयी जागरूकता निर्माण झाली आहे. व भविष्यामध्ये पर्यावरणाची कशी संवर्धन करायचे आहे याची जाणीव त्यांना झालेली आहे.
या उपक्रमाचा उद्देश हा फक्त मुलांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती निर्माण करणे हा होता त्याकरता गणेश मंडळाने हा उपक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे राबवलेला आहे. असे मत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले तसेच पुढील काळात सोसायटीच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा शिवम ग्रीन कोर्ट च्या सदस्यांनी सांगितले
शिवम ग्रीन कोर्ट गणेश मंडळातर्फे सर्व भाविक भक्त विद्यार्थी पालक व नागरिकांचे स्वागत करण्यात आले तसेच दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान घेण्यात आले.
या स्पर्धेत सोसायटी मधील चिमुकल्या सह विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भरभरून प्रतिसाद दिला.