विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलमधून २८ जणांची गायन स्पर्धेसाठी निवड,
चाकण : प्रतिनिधी
येथील विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्याव्हॅली आयडॉल या गायन स्पर्धेचा अंतिम सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या अंतिम सोहळ्यात २८ स्पर्धकांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला जयंत कोते, प्रसिद्ध सितार वादक लोकेश कुलकर्णी, मनुजा लंबदाडे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. श्रेया गाढवे हिची यावेळेस विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेचे संस्थापक साहेबराव देशमुख, खजिनदार सुमन देशमुख, संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख, सचिव रोहिणी देशमुख, उपाध्यक्ष अक्षय देशमुख, हर्षल देशमुख आदी उपस्थित होते.
श्रेया गाढवे व नयन बाळसराफ यांनी यावेळी उत्कृष्ट गीताचे सादरीकरण केले. परीक्षक लोकेश कुलकर्णी यांनी सितार वादन तर जयंत कोते यांनी माऊथ ऑर्गनने उत्कृष्ट गीतांचे सादरीकरण केले. प्रसिद्ध व्हायोलिन वादक मनुजा लंबदाडे यांच्या साथीने हर्षदा जोशी यांच्या अप्रतिम गीतांचे सादरीकरण झाले. या गायन स्पर्धेला चाकण परिसरातील इनोव्हेटिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना मंगलोरे, इंटेलिजंस कॅडेट स्कूलच्या मुख्याध्यापिका शिबी राजू, गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा गुंजाळ यांनी उपस्थिती दर्शविली.
अंतिम सोहळ्यातील सर्व गायक स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. शाळेच्या संगीत शिक्षिका नयन बाळसराफ व हर्षदा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते चौथी या गटात निशांत जोशी हा अंतिम विजेता ठरला.
पाचवी ते दहावी या गटात पूर्वी साळवी ही अंतिम विजेती ठरली. विजेत्यांना यावेळी ट्रॉफी व सहभागी सर्व नवोदित गायकांना प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या स्वाती रणदिवे व विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य दीपक शिंदे यांनी परीश्रम घेतले. अजित बाळसराफ यांनी त्यांना साथ दिली.रोहिणी वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. तनिष्का माळी यांनी आभार मानले.